– सुसज्ज बालोद्यानाअभावी शहर झाले भकास
– ग्रिन जिमवरच भर – बालोद्यानांना बाय बाय
– शहरवस्ती बाहेरील बालोद्यानाची दुरावस्था
– बालकांसह पालकांचा न.प. प्रशाषणावर रोष
रामटेक :- बालकांना खेळण्यासाठी तथा त्यांच्या पालकांना त्यांना खेळवण्यासाठी शहरवस्तीमध्ये एकही बालोद्यान नसल्यामुळे बालकांसह पालकांमध्ये न. प. प्रशाषणाच्या कार्यप्रणालीबाबद मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहे. पुर्वी शहरामध्ये असलेली बालोद्याने तथा बागबगीचे गेल्या काही वर्षापुर्वीच उध्वस्त झालेली असुन शहरवस्तीत एकही सुसज्ज बालोद्यान नसल्यामुळे बालकांसह पालकांचाही मोठा हिरमोड होत आहे.
विशेष म्हणजे जवळपास दहा ते बारा वर्षाच्या कालखंडात रामटेक नगरपालिका प्रशाषणाने शहरातील बालोद्यानांकडे जातीने लक्ष दिलेच नसल्याने पुर्वी होती-नव्हती बालोद्यानेही पुर्णतः उध्वस्त झालेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये फक्त ग्रिन जिम वरच भर देण्यात आलेला आहे. काही बालोद्यानांच्या जागेवर तर बागबगीचे तथा बालकांसाठी खेळणी उभारण्याऐवजी ग्रिन जिम उभारूण बालकांसह त्यांच्या पालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम न.प. प्रशाषणामार्फत करण्यात आलेले आहे. दहा ते पंधरा वर्षापुर्वीची परिस्थिती पहाली तर तेव्हा शहरामध्ये ठिकठिकाणी बालोद्याने होती. तेथील बागबगीच्यांची हिरवळ तथा लावण्यात आलेली खेळणी बालकांसह पालकांचे मन आकर्षीत करणारी ठरत होती. येथे बागबगीच्यांसह खेळण्यांची देखरेख करण्यासाठी न.प. चा एक कर्मचारीसुद्धा तटस्थ असायचा. याद्वारे एका व्यक्तीला येथे रोजगार निर्माण झालेला होता. अशा बालोद्यानात शहरातील बालगोपाल मंडळी यथाच्य ताव मारतांना म्हणजेच खेळतांना दिसुन यायची. त्यांच्या ओरडण्याने संपुर्ण परिसर गजबजुन जायचा. यातच पालकमंडळी सुद्धा येथे एकत्रीत येवुन गप्पा मारीत निवांत बसतांना दिसुन येत होते. एकंदरीत या बालोद्यानांमुळे शहराला सुंदरतेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र यानंतर न.प. प्रशाषनाद्वारे अशी बालोद्याने उपेक्षीत ठरू लागली. सुरुवातीला येथील कर्मचार्याला हलविण्यात आले. तद्नंतर बागबगीचे नष्ट झाले व त्यानंतर खेळणी तुटफुट झाली व शेवटी ही सर्व बालोद्याने उध्वस्त झाली. हे सर्व होत असतांना व झाल्यावर गेली कित्येक वर्ष याकडे न.प. प्रशाषणाद्वारे लक्षच दिले गेले नाही. सध्यास्थितीमध्ये एक बालोद्यान गाववस्तीच्या बाहेर म्हणजेच राखी तलावाजवळ बनविण्यात आले असुन ते गाववस्तीच्या बाहेर असल्याने व तलावाला लागुन असल्याने भितीपोटी व तसेच त्याची दुरावस्था झाल्याने तेथे बालकांसह पालक फिरकण्यास तयार नाही त्यामुळे आजस्थितीमध्ये शहरात बालकांना खेळण्यासाठी व त्यांच्या पालकांना त्यांना खेळवण्यासाठी बालोद्यानेच नसल्याने त्यांचा मोठा हिरमोड झालेला असुन न.प. प्रशाषणाच्या ढिसाळ कार्यप्रणालीबाबद ते रोष व्यक्त करीत आहे.
शहरवस्ती बाहेरील बालोद्यानाची दुरावस्था
शहरवस्तीबाहेर राखी तलावाजवळ एक बालोद्यान बनविण्यात आलेले आहे. मात्र निर्माण झाल्यावर काही कालावधीतच त्याची दुरावस्था झाली. तेथील खेळणी तुटफुट झाली तथा काही उखडली. तेथील परीस्थिती पहाता निकृष्टतेचे पितळ उघडे पडते. आता तर तेथे चिमुकल्यांपेक्षा ज्यास्त प्रेमीयुगुलच तासनतास गप्पा मारत बसलेले दिसुन येतात. याचा सदगृहस्थांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत असतो.
दरम्यान याबाबद स्थानीक नगरपालीकेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की कालंका माता मंदीर पुढे असलेली जागा जेथे पुर्वी बालोद्यान होते ती नगर परिषदेची नसुन महसुल विभागाची आहे, ती जागा नगरपरीषदेला हस्तांतरण करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहे. तसेच आदर्श विद्यालयाच्या बाजुच्या जागेवर असलेल्या बगीच्यामध्ये लवकरच मुलांसाठी खेळणी लावण्यात येणार आहे. त्याबाबदची प्रक्रीया आमची सुरु असल्याचे त्यांनी माहिती देतांना सांगीतले.