मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

नवी दिल्ली :- मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती, पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना  पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत.

14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष 1761 मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी 14 जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यासह केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्यातून इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

असे असेल आयोजन

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील. यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक विशेषतः या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रत्येकाला असावी सामाजिक जबाबदारीची जाणीव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sun Jan 12 , 2025
– रोटरी इंटरनॅशनलतर्फे वार्षिक परिषद नागपूर :- समाजात खूप समस्या आहेत. पण प्रत्येक समस्या पैशाने सुटणार नाही. पैसा हे जीवन जगण्याचे साधन आहे, पण ते साध्य असू शकत नाही. त्यामुळे समाजातील शीषित, वंचित, पीडितांच्या समस्या सोडवायच्या असतील तर प्रत्येकामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!