येरखेड्याच्या ग्रामविकास आघाडीच्या वार्ड क्र चारच्या प्रचाराचा शुभारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

अनिल बालाजी पाटील ने दिले वार्डाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही

कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मानले जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत च्या निवडणुकीत कांग्रेस समर्थीत येरखेडा ग्रामविकास आघाडीच्या वार्ड क्र चार मधील सरपंच पदाचे उमेदवार सह वार्ड क्र 4 चे उमेदवार अनिल पाटील ,सय्यद राशिदा बेगम व गीता दिलीप परतेकी यांनी आज निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

येरखेडा ग्रा प अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र चार चे कांग्रेस समर्थीत येरखेडा ग्रामविकास आघाडी पॅनल चे उमेदवार अनिल पाटील सह सय्यद राशिदा बेगम व गीता परतेकी यांनी वार्ड क्र चार च्या सर्वांगीण विकासासाठी आपण या निवडणूक रिंगणात सामोरे आले असून वार्डातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत ,नागरिकांना मूलभूत सुविधेसह चोवीस तास पाणीपूरवठा उपलब्ध करून देण्याचा अनुषंगाने योग्य ते नियोजन करने,स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, आदींसह गाव अंतर्गत रस्ते भूमिगत गटार योजना आदींच्या कामाना प्राधान्य दिले जाईल अशी गवाही उमेदवार अनिल पाटील,सय्यद राशिदा बेगम आसिफ अली,गीता परतेकी यांनी देऊन सरकारच्या विविध योजना आता थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी तयार झालेंल्या आहेत त्या पारदर्शकपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.

गावाच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी येत असतो त्याचा योग्य विनोयोग केला तर गावाचा निश्चित विकास साधता येईल व वार्डाचा विकास होईल. यासाठी मतदारांची साथ आवश्यक असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले तर या प्रचाराच्या शुभारंभानंतर वार्डातील मतदारांशी संपर्क साधला जात आहे व येरखेडा ग्रामविकास आघाडी च्या संकल्पना त्यांच्या समोर प्रचाराच्या माध्यमातून सांगितल्या जात आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आनंद नगरात सिकल सेल तपासणी शिबिर

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यक्रमातील सिकलसेल सप्ताह कार्यक्रम अंतर्गत आनंद नगरातील समाज भवनात सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारला करण्यात आले माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कामठी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानूनी, आशा गट प्रवर्तक रश्मि वानखेड़े, प्रयोग शाळा तंत्र प्रियंका भोयरकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com