संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारेगाव बाह्य वळण मार्गावरील स्वतःच्या शेतात शेतीकामासाठी सायकल ने गेलेल्या तरुणाचा मागील पाच दिवसापासून बेपत्ता झाल्याची घटना घडली असता शोधाशोध दरम्यान बेपत्ता तरुणाची सायकल आढळली पण बेपत्ता तरुणाचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने चिंतेचा विषय होता तर तब्बल पाच दिवसानंतर आज दुपारी 21 ऑक्टोबर ला दुपारी दीड दरम्यान त्याच शेतातील बाभूळ च्या झाडाला लाकडी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या स्थितीत मृतदेह आढळल्याने ही हत्या की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे तर मृतकाचे नाव तरुण राजेश यादव वय 20 वर्षे रा यादवनगर कामठी असे आहे.