संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी नगर रहिवासी 35 वर्षीय विवाहित तरुण अज्ञात कारणावरून दोन दिवसांपूर्वी घरून बेपत्ता झाल्याची घटना घडली असता घरमंडळींनी ठिकठिकाणी शोध घेतला होता मात्र कुठेही या बेपत्ता तरुणाचा थांगपत्ता लागत नव्हता अंतता आज दुपारी साडे तीन दरम्यान सदर तरुणाचा कन्हान नदीत चक्क मृतदेहच आढळल्याने सर्वाना एकच धक्का बसला असून मृतक तरुणाचे नाव अतुल महेश बढेल वय 35 वर्षे रा कमसरी बाजार कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठिमागे आई, भावंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.