संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कान्हान नदी पात्राच्या रेल्वे ब्रिज खाली कपिलनगर नागपूर रहिवासी 37 वर्षोय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना काल सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव आशिष देवराव पाटील असे आहे.
.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविन्यात आले.यासंदर्भात पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही.