अमरावती :-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने नुकतेच ‘बेस्ट सेमिनार’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्याथ्र्यांमध्ये अभ्यासू वृत्ती वाढावी, नवनवीन संशोधनाला चालना मिळावी, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. एच.पी. नांदुरकर, प्रमुख अतिथी म्हणून जैवतंत्रज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा वाडेगांवकर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संंस्थेच्या प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. यशश्री गढीकर यांची उपस्थिती होती. ‘आयटेम सेल्स इन रिजनरेटीव्ह मेडीसीन’ या विषयावर डॉ. वर्षा वाडेगांवकर यांनी प्रकाश टाकला. डॉ. यशश्री गढीकर म्हणाल्या, विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानाचा मालक नसावा, तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच सर्वांगीण विकास घडावा. विज्ञान, तंत्रज्ञानाचा सांगड घालून समाजोपयोगी कल्पना सूचल्या पाहिजेत, सृजनात्मक गुणांमुळे उद्याचे संशोधक तयार झाले पाहिजेत.
स्पर्धेत रचना धुरे, श्रृतिका क्षीरसागर, हुनैन फिजा या विद्यार्थीनींनी क्रमशः प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांक मिळविला.
डॉ. एच.पी. नांदुरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना विद्याथ्र्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, समयसूचका, अभ्यासू वृत्ती वाढावी, या दृष्टीकोनातून अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. दामिनी परमार हिने पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन पूजा चव्हाण, तर आभार श्रृतिका पाटील हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विभागातील कर्मचारी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विभागातील कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.