नागपूर :- नंदनवन पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, श्रीकृष्ण नगर चौक, सार्वजनिक ठिकाणी येथे एक इसम हातात शरख घेवुन धुमधाम करतांना दिसला, तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना, त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याचे हातातुन एक लोखंडी चाकु मिळुन आल्याने ताब्यात घेतला. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सिध्दांत अनिल पिल्लेवान, वय २३ वर्षे, रा. शास्त्रीनगर, बनकर दवाखान्या समोर, नागपूर असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन एक लोखंडी मोठा चाकु किंमती ५००/-रू. चा जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्व बाळगुण धुमधाम करतांना समक्ष मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे नंदनवन येथे पोउपनि. राऊत यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com