महाकाली यात्रेची व्यवस्था प्रगतीपथावर, मनपाने केली निर्माल्य कलशांची व्यवस्था

– ७ निर्माल्य कलशांची उभारणी

चंद्रपूर :- २७ मार्च पासुन सुरु होणाऱ्या “देवी महाकाली” यात्रेची व्यवस्था प्रगतीपथावर असुन मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्याद्वारे व्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात आहे. यात्रेदरम्यान भाविकांद्वारे मोठ्या प्रमाणात हार फुले अर्पण केले जातात. सदर निर्माल्य इतरत्र कुठेही टाकुन परीसरात कचरा निर्माण होऊ नये या दृष्टीने ७ निर्माल्य कलशांची उभारणी मनपातर्फे करण्यात आली आहे.

महानगपालिका प्रशासनातर्फ़े झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई करण्यात आली असून याच भागात भक्तांकरिता मांडव सुद्धा टाकण्यात आला आहे. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात १००० लिटरची क्षमता असलेल्या १५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येत आहे.

भाविकांना आंघोळीसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरद्वारे आंघोळीची व्यवस्था करण्यात येत असुन सुलभ शौचालय, प्री कास्ट व फिरते शौचालय यांची व्यवस्था केली गेली आहे. भाविकांकरीता यात्रा परिसरात मंडप तसेच बैल बाजार परीसर, पंजाबी वाडी व संपूर्ण यात्रा परीसरात विदयुत व्यवस्था उभारली जात आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवेचे मनपा आरोग्य पथक पुर्ण वेळ उपस्थित असुन २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे. वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या ७ शाळा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.   

या काळात मंदिर परिसरात दुकानदारांद्वारे कचरा निर्माण होऊ नये यासाठी मनपाच्या उपद्रव नियंत्रण पथकाद्वारे नियमित पाहणी केली जात असुन दुकानदारांना तश्या सुचना देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून झरपट बंधारा,कोहीनूर मैदान,बैलबाजार भाग, गौतमनगर सुलभ शौचालय व शासकीय अध्यापक विद्यालय जवळील जागांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सदर महाकाली मंदिर यात्रा ६ एप्रिल पर्यंत सुरु राहणार असुन या उत्सवा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवावेत - मंत्री संजय राठोड

Sat Mar 25 , 2023
मुंबई :- मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सामाजिक न्याय विभागाने अन्य संबंधित विभागांच्या समन्वयाने कालबद्ध पद्धतीने सोडवावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विधान भवनातील समिती कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, अमित देशमुख, नारायण कुचे, दीपक चव्हाण, राजेश पवार, राजेश राठोड, सुनील कांबळे, नामदेव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!