मुंबई :- नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे संपन्न झाली.
बैठकीला केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत केंद्राच्या वार्षिक लेख्यांना तसेच खर्चाला मान्यता देण्यात आली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी केंद्राच्या अधिपत्याखालील राज्यांमध्ये सांस्कृतिक कार्याला चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.