रामटेक येथे पटवारी संघटनेची वार्षिक आमसभा थाटात संपन्न

– उद्घाटनप्रसंगी विविध राजकियांची हजेरी

रामटेक :- पटवारी संघटनेच्या वार्षीक आमसभेचा दोन दिवसीय कार्यक्रम नुकताच दि. २७ व २८ मे दरम्यान मोठ्या थाटात पार पडला. यावेळी विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. दरम्यान विविध राजकियांनी सुद्धा सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आवर्जुन हजेरी लावली होती.

शहरातील टक्कामोरे सभागृहात सदर आमसभेचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पैकी पहित्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ मे रोज शनिवारला सायं. ६ वाजता वार्षिक आमसभा कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यानंतर याच दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २८ मे ला सकाळी १०.३० दरम्यान वार्षीक आमसभेला सरुवात झाली. यात विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांमध्ये प्रामुख्याने एस.डी.ओ. वंदना सवरंगपते , तहसिलदार हंसा मोहने, प्रशांत सांगोडे (तहसीलदार पारशीवनी),बाळकृष्ण गाढवे (अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ), श्याम जोशी (सल्लागार, म.रा. समन्व्यक महासंघ),संजय आनव्हाने (सरचिटणीस, विदर्भ पटवारी संघ नागपुर), प्रकाश सुर्वे (उपाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपुर), विजय बोराखडे (कोशाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपुर),  विजय टेकाडे (अध्यक्ष, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर), एच.पी. मलिये (सरचिटणीस, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर), राजेश चुटे (अध्यक्ष, वी.प. संघ शाखा नागपुर),  गजानन भागवत (सहसचिव, विदर्भ पटवारी संघ नागपुर),  विजय मर्जीवे (सचिव, वी.प.संघ शाखा नागपुर), मो.जहीर शेख (कोशाध्यक्ष, वी.प.संघ शाखा नागपुर), संकेत पालंदूरकर, संदीप आवळेकर, मुनेश बांगर,प्रतिक काष्ठे यांचेसह पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

City organizations to felicitate Dr. Brijesh Dixit for the gift of the Metro

Tue May 30 , 2023
Nagpur :-VED Economic Development Council is holding a felicitation programme for Dr. Brijesh Dixit Ex-Managing Director as his tenure in Nagpur comes to an end. VED wishes to give him public recognition for his singular boon to the city – the Nagpur Mahametro, where he played a key role. The metro matches international standards and finds mention in The Metro […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!