मागण्या पूर्ण होईपर्यंत आदिम हलबा,हलबी जमातीचे आंदोलन सुरु राहील

नागपूर :- आदिम हलबांच्या जुन्या अभिलेख्यात कोष्टी ( विणकरी ) व्यवसायाची नोंद असल्याने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे घटना दुरुस्तीची त्वरित शिफारस करावी,यासह अन्य मागण्यासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने आदिम हलबांचा आक्रोश दाखविण्यासाठी गोळीबार चौकात अभय धकाते यांचे आमरण उपोषण दि. १० डिसेंबर पासून सुरु होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतांना १० दिवसापासून गोळीबार चौकात सुरु असलेले आमरण उपोषण सोडविण्यासंबंधी सांगितले ,या आमरण उपोषणाची दखल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार विकास कुंभारे,आमदार प्रवीण दटके हे उपोषण मंडपात आले.त्यावेळी जय भीम जय आदिम,हलबा एकता जिंदाबाद ,हमारी मागणी पुरी करो,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद,संविधानाचा विजय असो. अश्या गगनभेदी नारे लावून गोळीबार चौक दणाणून सोडला. 

मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यासंबंधी उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर हलबांच्या जुन्या अभिलेख्यात कोष्टी ( विणकरी ) व्यवसायाची नोंद असल्यासंबंधी उच्च न्यायालयातील निर्णयावर १ महिन्यात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन केंद्र सरकारकडे घटना दुरुस्तीची शिफारस करेल, केंद्रीय कायदा क्रमांक १०८/१९७६ प्रमाणे अनुसूचित जमातीचा दर्जा आदिवासींना मिळाला म्हणून सन १९७६ पूर्वीचे जाती व रहिवासींचे अभिलेख विचारात घेऊन जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा जी आर काढण्यात येईल,अनुसूचित जमातीच्या कर्मचा-यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग झाली त्यांना सर्व शासकीय लाभ देण्यात येईल, हलबा युवकांच्या रोजगारासाठी महामंडळ करण्यात येईल.असे उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागण्यांवर निर्णय करण्याची जबाबदारी घ्यावी,असे विश्वनाथ आसई यांनी उपोषण मंडपात आव्हान करून मागण्या पूर्ण होईपर्यंत आदिम हलबा,हलबी जमातीचे आंदोलन सुरु राहील अशी घोषणा केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमरण उपोषणकर्ते अभय धकाते यांचे उपोषण सोडवितांना आदिम हलबा, हलबी जमातींच्या मागण्या शासनाकडून त्वरित पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याची घोषणा शेकडो आदिम हलबा बांधवांसमोर केली.

यावेळी उपोषण मंडपात आदिम नेत्या ॲड.नंदा पराते, दे.बा.नांदकर,धनंजय धापोडकर,प्रकाश निमजे, दिपराज पार्डीकर,प्रवीण भिसीकर,राजेंद्र सोनकुसरे,राजू धकाते,रमेश पुणेकर, धनराज पखाले,मनोहर घोराडकर, प्रेमलाल भांदककर, जितेंद्र मोहाडीकर,अश्विन अंजीकर,दिपक उमरेडकर,हरेश निमजे, श्याम चांदेकर,प्रदीप पौनीकर,मोरेश्वर पराते,प्रमोद गडीकर,जिजा धकाते,छाया खापेकर, श्रीकांत ढोलके,नरेंद्र मौदेकर,शिवशंकर रणदिवे,भास्कर चिचघरे,नरेंद्र भिवापूरकर, पंकेश निमजे,चेतन निखारे, आकाश पौनीकर,रवी पराते, मोतीराम मोहाडीकर,सचिन बोरीकर,विजय धकाते,शुभम खडगी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार - धनंजय मुंडे

Wed Dec 20 , 2023
नागपूर :- राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 97 अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com