नागपूर :- दि २१/११/२३ मंगळवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालमत्ता कर विभागाच्या कार्यासबंधी अतिरिक्त आयुक्त (शहर) मनपाद्वारा आढावा घेण्यात घेण्यात आला. आढावा बैठकीत उपायुक्त (महसुल), सर्व झोन सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षा करीता मालमत्ता कर अपेक्षित आय रु ३०० कोटीचे उद्दिष्ट गाठणे हेतू निश्चित केलेले झोन निहाय दैनंदिन उद्दिष्ट प्रत्येक झोन द्वारा गाठणे अपेक्षित आहे त्या करीता झोन सहाय्यक आयुक्तांनी रू ५ लक्ष पेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकाकडे स्वत: जाऊन थकीत रक्कम वसूल करून घेणे संबधी, तसेच रु १ लक्ष ते ५ लक्ष पर्यत मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकाकडे सहायक अधिक्षक च्या नेतृत्वात मालमत्ता कर वसुली पथक द्वारा वसुलीची उचित कार्यवाही करुन घेणेचे निर्देश अति आयुक्त (शहर) यांनी सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच १३५६ थकबाकीदाराकरीता काढलेल्या मालमत्ता कर वसुली वारंट अतंर्गत कार्यवाही पुर्ण करुन रु २५ कोटी थकीत मालमत्ता कर रक्कम ५ डिसेंबर २०२३ पर्यंत वसुल करणेचे निर्देश सर्व झोन सहाय्यक आयुक्ताना देण्यात आले.