अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई 

नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे खापरखेडा परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखविद्वारे खबर मिळाली की, चनकापूर येथे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार नामे आशिष उर्फ गुल्लु राजबहादुर वर्मा रा. चनकापुर, खापरखेडा हा मिलन चौक खापरखेडा येथे माऊजर सह येणार आहे. अशा माहितीवरून पथकाने सदर ठिकाणी १८.४५ वाजता सुमारास सापळा रचून त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीत त्याचे कमरेला एक देशी वनावटीचे लोखंडी माऊजर किंमती २५,०००/- रू. आणि मॅगझिन मध्ये ०२ जिवंत काडतूस किंमती २०००/- रू. असा एकूण २७०००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. त्यास सदरचे अग्निशरव कुठून आणले याबाबत विचारणा केली असता सन २०१७ मध्ये लखनसिंग सरदार रा. खरगोन, मध्यप्रदेश याने साहुली येथे आणून दिल्याचे सांगितले. दोन्ही आरोपी इसमाविरुद्ध पो.स्टे. खापरखेडा अप. क्र. ३२३/२४ कलम ३. २५ भारतीय शस्त्र अधि. अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाहिकामी पो.स्टे. खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पो.हवा. रोशन काळे, पो. हवा. आशिष मुंगळे, पो.हवा. नितेश पिपरोदे, पो.हवा. शंकर मडावी, पो.हवा. उमेश फुलवेल, नापोशी विरेंद्र नरड, नापोशी विपीन गायधने, चापो. हवा अमोल कुथे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'आरोग्य शिबिरातून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान व हास्यातच देव दिसतो’ - पालकमंत्री संजय राठोड यांचे भावोद्गार

Sat Jun 15 , 2024
– नेर येथील आरोग्य शिबिराचा दीड हजारावर रुग्णांनी घेतला लाभ यवतमाळ :- ‘मी राजकारणापेक्षा समाजकारणाला कायम प्राधान्य दिले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून नागरिकांना आरोग्य शिबिरातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सातत्याने करतो. या शिबिरातून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान व हास्यात मला माझा देव दिसतो’, असे भावोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले. माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com