पारशिवनी :- अंतर्गत ०३ कि. मी अंतरावर मौजा पालोरा येथे दिनांक १३/१०/२०२३ चे १३.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी रितेश माधवराव कामडे, वय ३० वर्ष, रा. पालोरा ता. पारशिवनी याचा पुतण्या जखमी नामे चेतन गजानन कामडे, वय २१ वर्ष, रा. पालोरा यांनी आरोपीच्या घराच्या बाहेर जाऊन आरोपींना आम्हाला शिवीगाळ का करतो असे म्हणुन हटकले असता आरोपी क्र. ०१ यांना फिर्यादी व फिर्यादिचे पुतण्याची गच्ची पकडुन तुम्हाला दाखवु का असे म्हणुन आरोपी नामे- १) प्रदिप धनराज कामडे वय ४७ वर्ष २) उमेश प्रदिप कामडे वय १९ वर्ष दोन्ही रा. पालोरा ता. पारशिवनी यांनी संगणमत करूण शिवीगाळ केली व आरोपी क्र. ०२ याने फिर्यादिचे पुतण्याला जिवे मारण्याचा उद्देशाने पाठीमागुन येउन त्याचा कमरेखाली डाव्या पुष्ठावर सतुरने वार करून गंभीर जखमी केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीताविरुद्ध कलम ३०७, ५०४, ३४ भा. द.वी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे पोस्टे पारशिवनी हे करीत आहे.