काटोल :- फिर्यादी नामे प्रभुदयाल शमदिन रागेड, वय ५८ वर्ष रा. कुर्तलापुर उत्तर प्रदेश ह. मु. सरस्वती नगर काटोल यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन काटोल येथे अप. क्र. ७६१/२२ कलम ३०७ भादवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील जखमी फिर्यादी व आरोपी नामे रामा उर्फ रामराव ज्ञानेश्वर दोईजोडे, वय ५० वर्ष, रा. अण्णाभाऊ साठे नगर काटोल हे चाय पिण्याकरीता हॉटेल वर गेले असता आरोपी सोवत असलेल्या कुत्र्याने एका अज्ञात मुलास चावा घेतला. त्यावरून फिर्यादीने आरोपीस हटकले तेव्हा आरोपीने जखमी फिर्यादीस शिवीगाळ केली. दिनांक १०/१०/२०२२ चे १७/०० वा. ते १७/३० वा दरम्यान जखमी फिर्यादी हा बाजारात गेला असता आरोपी तेथे येवुन “तुने मुझे तब क्यो टोका “असे म्हणुन जिव घेण्याचा उददेशाने फिर्यादीच्या डाव्या कानावर व गळयावर चाकूने मारूण गंभीर जखमी केले.
सदर प्रकरणाचे तपास पोउपनि चौहाण पो. स्टे. काटोल यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. ६ अली साो. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०५/०६/२०२४ रोजी डी. जे. ६ अली सो. यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३०७ भादवी मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रू दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी साखरे सो. यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोशि प्रमोद कोहळे पोस्टे काटोल यांनी मदत केली आहे.