जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

सावनेर :- दिनांक ०३/०८/२०१९ चे ०२/२२ वा. दरम्यान फिर्यादी नामे-धर्मेंद्र पुंडलिकराव बनकर, वय २० वर्ष रा, तेलकामठी सावनेर यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप, क्र. ५५६/२०१९ कलम ३०७ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

दिनांक ०२/०८/२०१९ चे १८.३० वा. दरम्यान यातील आरोपी नामे प्रविण धनराज बनकर, वय २८ वर्ष रा. तेलकामठी सावनेर याने जखमी राहुल बनकर याचे आरोपीचे पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे कारणावरून आरोपीने जखमी राहुल यास गळ्यावर चाकुने मारून गंभीर जखमी करून जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रकरणाचे तपास पोउपनि सतिश पाटील यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. -१० आर. आर. भोसले सा. कोर्टामध्ये सादर केले, आज दिनांक १७/०१/२०२४ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश मा. डौ, जे, १० आर, आर, भोसले सा, यांनी वरील नमुद आरोपीला सदर गुन्हयात कलम ३२६ भांदवि मध्ये ४ वर्ष सश्रम कारावास व १५,०००/- रु. दंड दंड न भरल्यास ०१ वर्ष साथी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी घाडगे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार मधुकर आदमने यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Thu Jan 18 , 2024
मौदा :- दिनांक १५/०१/२०२४ रोजी पोस्टे मौदा येथील पोलीस पथक पोस्टे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतील १४ किमी अंतरावर मौजा किरणापुर घाट येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची विना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोस्टे मौदा येथील पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता आरोपी नामे देवानंद पंढरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com