नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हदीत राहणारी २३ वर्षीय फिर्यादी मुलीची ओळख इंस्टाग्रामद्वारे सन २०२० मध्ये आरोपी राज उर्फ राघवेन्द्र राधेश्याम यादव वय ३१ वर्ष रा. वासुदेव नगर, एश्वर्या रेसीडेन्सी, पोलीस ठाणे हिंगणा याचे सोबत होवून मैत्री झाली होती. आरोपीने फिर्यादी सोबत जबरीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे आरोपीविरूध्द दि. ०५१२.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी हा जेल दाखल झाला होता. दि. १०.०१.२०२४ मध्ये जमानतीवर बाहेर आलेला होता.
दिनांक १२.०२.२०२४ चे १९.४५ वा. चे सुमारास, फिर्यादी मुलगी ही तिथे एलेझर मोपेड गाडीने तेलंगखेडी हनुमान मंदीर येथे गेली होती. तेथे आरोपी हा दिसल्याने फिर्यादी आपले घराकडे जाण्यासाठी निघाली, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, टिव्ही टावर चौका कडून आय. बी. एम रोडचे उतारावरून गिट्टीखदान कडे जात असता आरोपी राघवेन्द्र याने त्याचे एक्स.यू.व्ही ५०० कार क. एम.एच ३१ एफ.ए ५२६९ ने पाठलाग करून फिर्यादीचे मागुन येवुन फिर्यादीला जिवे ठार मारण्याचे उद्देश्याने कारने मागुन फिर्यादीचे मोपेड गाडीला भडक मारून पळून गेला. फिर्यादी ही खाली पडल्याने तिचे हातापायाला व कमरेला मार लागुन किरकोळ जखमी झाली. तसेच मोपेड गाडीचे नुकसान झाले. लोकांनी फिर्यादीला रोडचे बाजुला केले. फिर्यादीने पोलीसांना सुचना दिली, फिर्यादीचा उपचार करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे गिट्टीखदान येथे मपोउपनि डाकेवाड यांनी आरोपीविरूध्द कलम ३०७ भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.