काटोल :- अतर्गत १० कि. मी अंतरावरील ढवळापुरा हेटी येथे फिर्यादी संजय शामराव खंडाते, वय ४८ वर्ष, रा. ढवळापुरा काटोल हा त्यांचे घराचे अंगणामध्ये बसला होता त्याचे घरासमोरील लाकडी बेंचवर फिर्यादीची आई सरस्वती शामराव खंडाते, वय ७५ वर्ष ही बसली होती व तिच्या बाजुला फिर्यादीच्या शेजारी राहणारी सरस्वता शेषराव चलके ही बसली होती फिर्यादीच्या मोहल्ल्यामध्ये राहणारा यातील आरोपी वासुदेव बाळकृष्ण पंधराम, वय ६० वर्ष हा तेथून जात होता त्यावेळी सरस्वता शेषराव वळके हिचा घरचा कुत्रा त्याचेवर भुंकत होता यावरून आरोपीने तु तुझा कुत्रा सांभाळुन का ठेवत नाही असे म्हणुन तिच्या गालावर एक थापड मारली म्हणून फिर्यादीची आई ही आरोपीस म्हणाली कि, “का बर तु झगडा भांडन करीत आहे” असे म्हटले असता आरोपीने तु का मधात बोलली थाब तुला जिवानीशी ठार करतो असे म्हणुन तिच्या घरामधुन कुन्हाड घेवुन आला फिर्यादीच्या आईच्या डोक्यावर मारली त्यामुळे फिर्यादीची आई नाम सास्वतीबाई शामराव खंडाते ही जखमी झाली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोस्टे काटोल येथे आरोपीविरुद्ध कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील पास पोलीस उपनिरीक्षक पुनम कोरडे पोस्टे.काटोल या करीत आहे.