उमरेड :– अंतर्गत १६ कि. मी अंतरावरील मौजा पिरावा ता. भिवापूर जि. नागपूर येथे दिनांक ०४/०८/२०२३ चे १७.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी बापुराव लोलबा गायकवाड, वय ७५ वर्ष, रा. पिराव ता. भिवापूर जि. नागपूर व आरोपी नामे— कमलाकर मोतीराम रखई, वय ४२ वर्ष, रा. पिरावा. ता. भिवापूर जिल्हा नागपूर हे एकाच गावात राहणारे असून एकमेकांना ओळखतात. फिर्यादी व आरोपी यांचे ७ वर्षा अगोदर झगडाभांडण झाले होते. तेव्हा पासुन आरोपी हा फिर्यादी सोबत झगडा भांडण करण्याचा प्रयत्न करित होता. नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी फिर्यादी हे गावातील हनुमान मंदीराजवळील ओटयावर बसुन गावातील सुभास समर्थ याचे सोबत बोलत असतांना आरोपी तेथे आला व फिर्यादीस शिवीगाळ करू लागता फिर्यादीने त्यास समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या जवळील चाकु काढुन “थांब तुझा आता जिवच घेतो” असे म्हणून चाकु फिर्यादीच्या छातीवर मारला तो चाकु छातीत घुसला, पुन्हा चाकु मारत असताना फिर्यादिने तो उजव्या हाताने पकडला तर हाताला जखम झाली, तेव्हा आरोपीने ठार मारण्याचा प्रयत्न केला. आज तर तुझा मुडदाच पाडतो” असे म्हणत फिर्यादीला चाकुने भोसकुन जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०७, ५०४, ५०६ भादवी. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले, पोस्टे उमरेड हे करीत आहे.