– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई
रामटेक :- अंतर्गत १० किमी अंतरावर घोटीटोक शिवार रामटेक येथे दिनांक १४/०१/२०२४ ते ११.१५ वा. ते दिनांक १४/०१/२०२४ चे ११.३० वा. दरम्यान फिर्यादी व उपविभागीय अधिकारी रामटेक विभाग रामटेक हे गौनखनिज अवैध वाहतुक होत असल्याचे माहिती मिळाल्यावरून रामटेक ते तुमसर मार्गाने पेट्रोलींग करीत असताना पोटीटोक येथे एक संशयति टिप्पर क्र. MH-40-AK-4158 यांना थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन चालकाने त्यांचेकडे मुद्दाम दुर्लश करून वाहनाचा अधिक वेग वाढवून अरोली मार्गाने पळुन जावु लागल्याने यातील फिर्यादी व उपविभागीय अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांचेसह पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या सोबत असलेले नॅनो कार क्र. MH-49-B-6616 हा चालक व त्याचा साथीदार टिपर चालकाला सांगितले की, गाड़ी थांबवू नको व फिर्यादी व त्यांच्या स्टाफ त्यांच्या ताफ्याच्या मध्ये येवून अडवणूक करीत होता, त्यांनंतर फिर्यादीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचे अंगावर नॅनो कार पासुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
दि १४/०१/२०२४ रोजी पोलीस स्टेशन रामटेक अप. क्र. ३३/२४ कलम ३०७,३२३,२८३, ३४ भादंवि सहकलम १८४ मोवाका अन्वये स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हयाचे समांतर तपासा दरम्यान गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून आरोपीतास आमडी पुलिया जवळुन ताब्यात घेऊन गुन्हयातील टिप्पर, कागदपत्रे, व आरोपी नामे- १) MH- 40/AK – 4158 चा चालक जागेश्वर हरिराम यादव, वय ३५ वर्ष रा. पारडी नागपूर २) मोनू कादर खान वय ३४ वर्ष रा खरबी नागपूर ३) विष्णू चंद्रप्रकाश मिश्रा वय ३३ वर्ष रा खरबी नागपूर यांना पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन रामटेक यांच्या ताब्यात देण्यात आले.
यावरून सदर प्रकरणी सरतर्फे भोजराज शंकर बडवाईक, वय ५१ वर्ष, रा. छोरिया ले आउट शितलवाडी ता. रामटेक यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. रामटेक येथे आरोपीताविरुध्द कलम ३५३, ३०७, २८३, ३४ भादवि सहकलम १८४ मोवाका, अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान महेश भटकर (कहान), तसेच पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी भेट दिली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के पोस्टे रामटेक हे करीत आहे.
सदरची कारवाई ही सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोहवा रोशन काळे, उमेश फूलबेल, शंकर मडावी, नितेश पिपरोदे, प्रमोद भोयर, विरेंद्र नरड, विपीन गावचने यांनी पार पाडली.