गुंगीचे औषध देऊन तरुणाची लुबाडणूक करणाऱ्या आरोपीस अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील एका चहा टपरीवर थांबुन डोनट नावाच्या वस्तूमध्ये गुंगीचे औषध घालून त्याच्याकडील बॅग ,एक मोबाईल , बॅग मध्ये असलेले महत्वपूर्ण कागदपत्र व नगदी 6 हजार 900 रुपये ,इतर साहित्य असा एकूण 20 हजार 900 रूपयाची लुबाडणूक करून पसार झालेल्या आरोपीचा शोध लावून अटक करण्यात आल्याची कारवाही नवीन कामठी पोलिसांनी नुकतेच केले असून आरोपीचे नाव रमेश यादव वय 58 वर्षे रा यशोधरा नगर नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अटक आरोपी हा ऍक्टिवा दुचाकीने नागपूरच्या बर्डीहून येत असता रस्त्यात उभे असलेला फिर्यादी 20 वर्षीय मुकेश पिछोडे रा बालाघाटला लिफ्ट देऊन कामठीला सोडून देत असता कामठी कळमना मार्गावरील रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून चहा टपरी मध्ये जाऊन चहा प्यायला गेले असता फिर्यादीला खाण्यासाठी दिलेल्या डोनट मध्ये गुंगीचे औषध दिले असता फिर्यादी तरुणाला चक्कर येऊन बेशुद्ध पडले असता आरोपिने त्याच्याकडील बॅग ,कागडपत्रे व,मोबाईल व नगदी 6 हजार 900 रुपये असा एकूण 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेत पळ काढला दरम्यान फिर्यादीला खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार झाले असता सर्व घटना फिर्यादीच्या लक्षात आले असता फिर्यादी मुकेश पिछोडे ने पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता काहीच दिवसात आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव रमेश यादव असे आहे.तर पुढील तपास एपीआय भातकुले करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर होणार कोरोना चाचणी

Sat Dec 24 , 2022
मनपा आयुक्तांचे निर्देश : संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा नागपूर : केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार उद्या शनिवार २४ डिसेंबरपासून शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com