कळमेश्वर :- फिर्यादी नामे मोहित वसंतराव पुसदकर वव २१ वर्ष रा. सावंगी (शेतकी) तालुका कळमेश्वर यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कळमेश्वर येथे अप क्र. ४३/२१ कलम ३०२, २०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद आलेला होता.
दिनांक १७/०१/२०२१ चे १७/३० ते २०/०१/२०२१ चे १५/३० वा. दरम्यान शेतात आरोपी नामे- रॉयसिंग भागीरथ उर्फ ठाकुरसिंग मेवाड, वय ४५ वर्ष, रा. सावंगी ता. कळमेश्वर व मृतक नामे वसंतराव गाँवीदराव पुसदकर वय ५१ वर्ष, रा. सावंगी दोघे बासाचे झाडाखाली पाणी पित असताना, मृतकास शेतात एकटे असल्याचा फायदा घेवुन मृतक व आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपीने मृतक यास काठी, विळा व कु-हाडनी मृतकाच्या हातावर चेहन्यावर, गळयावर व डोक्यावर मारून जिवानिशी ठार केले.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. ०४ पावसकर कोर्टामध्ये सादर केले. दिनांक २३/०२/२०२४ रोजी मा. डी. जे. ०४ श्री. पावसकर यांनी वरील नमुद आरोपीला सदर गुन्हयात कलम ३०२ भादंवि मध्ये आजीवन कारावास व १००००/- रू दंड, दंड न भरल्यास ०३ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी गजभीये यांनी काम पाहीले, फोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सफौ. सुरेद्रसिंग ठाकुर पो.स्टे. कळमेश्वर यांनी मदत केली आहे.