अवैधरीत्या घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

खापरखेडा :- अंतर्गत कुचक मोहल्ल्ला पिपळा डाग बंगला येथे दिनांक २२/०२/२०२४ से २२.३० वा. ते २३.१०. वा. दरम्यान खापरखेडा पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम कुचक मोहल्ला पिपळा डाग बंगला येथे सार्वजनिक ठिकाणी आमरस्त्यावर चाकूसारखे घातक शस्त्र घेऊन फिरत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून नमूद घटनास्थळी खापरखेडा पोलीसांनी पोहचुन आरोपी नामे विकेश उर्फे विक्की देवीदास चंद्रीकापुरे, वय ३५ वर्ष, रा. कुचक मोहल्ला पिपळा डाग बंगला हा कुचक मोहोल्ला पिपळा डाग बंगला येथे सार्वजनिक ठिकाणी आमरस्त्यावर चाकु घेऊन फिरतांनी मिळून आल्याने त्याचे ताब्यातुन एक लोखंडी चाकु अंदाजे किंमती १००/- रु. चा मिळुन आल्याने गुन्हयात जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले.

सदरची कार्यवाही ही हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोहवा शैलेश यादव, प्रफुल राठोड, पोना मुकेश वाघाडे, प्रदीप मने, राजू भोयर, कविता लोखंडे डीबी पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे.अरोली हद्दीमधील निमखेडा बाजार चौक येथे जुगार अड्डयावर धाड

Sat Feb 24 , 2024
– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई  नागपूर :- दिनांक २२/०२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ अवैध चंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन अरोली येथील निमखेड़ा बाजार चौक येथे काही इसम ५२ ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावुन जुगाराचा खेळ खेळत आहे. अशी गोपनिय माहीती पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफला प्राप्त झाली वरून सदर स्टाफ यांनी निमखेडा बाजार चौक येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com