खापरखेडा :- सरकार तर्फे फिर्यादी नामे- पोलीस निरीक्षक महेश दत्ताराव नाटे वय ५१ वर्ष यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. खापरखेडा येथे अप. क्र. २४/२०१७ कलम ३०२ २०१ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. कोणीतरी अज्ञात आरोपीने अनोळखी इसमास कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मृतकच्या डोक्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून जिवानीशी ठार केले व प्रेत वलनी पोलीस चौकीच्या मागे पाण्याचे कॅनल मध्ये पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फेकुन दिले. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान निष्पन्न झाले की, मृतक नामे- जॉन उर्फ कमलेशसिंग स्वामीदिन टेकाम व आरोपीची पत्नी यांचे प्रेमसंबंध असल्याचे संशयावरून आरोपीने मृतकास धारदार शस्त्राने जिवानाशी ठार केले.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. दिनांक ११/०७/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे ५ घुमरे. नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व ३०००/- रू. दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद कलम २०१ भादवि मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने साची केंद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी साखरे सो यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी कर्मचारी म्हणुन पोना / १९५४ सचान चौधरी पो.स्टे. खापरखेडा यांनी मदत केली आहे.