नागपूर :- आरोपी नामे अश्विन उर्फ गोंडया दिपक तेलंग वय ३० वर्ष रा आंबेडकर नगर यवतमाळ यास यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा नं ३३२/१८ कलम ३०२, ३४ भादवि च्या गुन्हयामध्ये आजीवन कारावासाची शिक्षा झाली असुन सदर आरोपी हा पे रोलवर (सेंट्रल जेल) येथुन सुट्यांवर आला असता सुट्या संपल्यावर सुध्दा तो जेलमध्ये गेला नसल्याने आरोपी अश्विन उर्फ गोंडया दियक तेलंग वय ३० वर्ष रा आंबेडकर नगर यवतमाळ याचेविरूध्द यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे अप क्र ५५४/२४ कलम २२४ भादवि अन्वये नोंद असुन आरोपी हा तेव्हापासुन फरार होता.
पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कार्यान्वीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोस्टे अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मुखवीद्वारे मिळालेल्या माहीती वरूण सदर ठिकाणी जाऊन पाहाणी केली असता सदर इसम मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे आणुन पोस्टे यवतमाळ शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही हर्ष ए पोहार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव गठीत विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे पोउपनी जगदीश पालीवाल, जीपोउपनी मिश्रा पोहवा आशिष टेकाम, पोहवा प्रशांत मांढरे, पोहवा युनूस खान, पोहवा कृणाल पारधी, पोशि दशरथ घुगरे, व पोशि माधव गुट्टे यांनी कामगिरी पार पाडली आहे.