नागपूर :- नागपूर ग्रामीण जिल्हातील ट्रान्सफॉर्मर फोडून कॉपर व अल्युमिनियम चोरीचे प्रमाणात वाढ झालेली असल्याने सदर गुन्हयाचे समांतर तपास व अज्ञात आरोपी शोध करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर फोडणारे इसम हे पन्नासे ले आऊट चौदा मैल नागपूर येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने व तिथे चोरीचा माल आहे अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने संशयीत राहत असलेल्या इसम विष्णू रामतीर्थ चौरसिया य, सिध्दार्थ नगर (उ.प्र) ह. मु. चौदामेल व फरार आरोपी आझाद अहमद फारुख शेख रा. चौदा मेल याचे घराची कायदेशीर झडती घेतली असता घराचे झडती मध्ये चोरी करण्या करिता लागणारे साहित्य मिळून आल्याने आरोपितास सखोल विचारपूस केली असता त्याने नागपूर ग्रामीण मध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले असून बोरी केलेला मुद्देमाल चोदा मैल येथील कबाडी दुकानदार प्रेमकुमार साहू य. चौदामेल नागपूर यास विकल्याचे सांगितले आरोपी कडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले.
उघडकीस आलेले गुन्हे-
१) पो.स्टे. कळमेश्वर अप क्र. २५/२४ कलम ३७९ भादवी.
२) पो.स्टे. कळमेश्वर अप क्र. १०३७/२३ कलम ३७९ भादवी.
३) पो.स्टे. सावनेर अप क्र. १०९५/२३ कलम ३७९ भादवी.
४) पो.स्टे. बेला अप क्र. ४३०/२३ कलम ३७९ भादवी.
५ ) पो.स्टे. कुही अप क्र. ८०६/२३ कलम ३७९ भादवी. ६) पो.स्टे. काटोल अप क्र. ६९/२४ कलम ३७९ भा.द.वी.
आरोपीतांकडुन १) लोखंड कापणायची मशीन, आरी, लोखंडी तार कटर वेट मशीन, पाने, ‘पेंचकूस, पेंचीस एकूण किमती ३०६००/- रु २) २०० किलो तांब्याच्या विंडींग तार को १४०,०००/-रु. असा एकूण १७०६००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि आशिष मोरखंडे, पोहवा अरविंद भगत, दिनेश अधापूरे, मिलिंद नांदूरकर, गजेंद्र चौधरी, राजू रेवतकर, पोलीस नायक रोहन डाखोरे, अमृत किंणगे, सतीश राठोड, पोलीस अंमलदार राकेश तालेवार, देशमुख, बालक पांडे यांनी पार पाडली.