नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण याने आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना मार्गदर्शनात कन्हान उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की पोस्टे कन्हान येथील अप क्र. ४६९ / २२ कलम ३७९, ३४ भादवि मधील पाहिजे असलेला आरोपी नामे शशांक नारायण मालाधरी, वय २७ वर्ष, रा. नगरधन ता. रामटेक हा बोरडा कन्हान हद्दीत राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा घरी हजर मिळुन आला. सदर आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्हयात आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करीता पोस्टे कन्हान यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, नाना राऊत, रोशन काळे, पोलीस नायक प्रमोद भोयर, विपीन गायधने यांचे पथकाने केली.