नागपूर :- महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे 23 वे राज्य अधिवेशन तथा राज्य व विभागीय कार्यकारिणीची निवडणूक 23 मार्च ला सातारा येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाली प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार पुणे जयंत आसगावकर, भोजराज काळे अध्यक्ष सल्लागार समिती युनायटेड फेडरेशन नवी दिल्ली, महादेव माळी राज्याध्यक्ष तथा महासचिव युनायटेड फेडरेशन नवी दिल्ली, विनोद दुर्गपुरोहित सरचिटणीस निदेशक संघटना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या अधिवेशनात राज्य कार्यकारिणीसह महाराष्ट्रातील सहाही विभागाच्या कार्यकारिणीची देखील निवडणुक पार पडली. म.रा.आय.टी.आय. निदेशक संघटना राज्य कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये नागपूर विभागातून शिवाजी ढुमणे सहचिटणीस तर साहेबराव गुडधे राज्य सदस्य म्हणून भरघोस मतांनी विजयी झाले व इतर सहा विभागातून आठ पदाधिकारी निवडून आले. तसेच नागपूर विभागाच्या निवडणुकीत विभागीय अध्यक्ष म्हणून प्रेमानंद भैसारे, उपाध्यक्ष जितेंद्र टोंगे, सचिव सचिन माळीचकर, सहसचिव विपिन मेश्राम, कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, सदस्य धीरज सव्वालाखे व अपील रंगारी हे विजयी झाले. या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा येथे जवळपास तीन हजार निदेशक बांधव सहभागी झाले. यावेळी निदेशकांच्या समस्या, विविध ठराव व प्रलंबित मागण्यावर चर्चासत्र आयोजित केले उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त करत योग्य उमेदवार निवडण्यासाठी संविधानिक मार्गाने खेळीमेळीच्या वातावरणात मतप्रक्रिया पार पाडली.
महाराष्ट्र राज्य आय टीआय निदेशक संघटनेचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com