राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल मतदारांचे आभार – ना. सुधीर मुनगंटीवार

– मतदानासाठी नागरिकांमध्‍ये दिसला प्रचंड उत्‍साह

चंद्रपूर :- लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज (दि. १९ एप्रिल) मतदान प्रक्रियेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेषतः नवमतदारांनी अतिशय उत्साहाने मतदान केले. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

‘निकालाची चिंता न करता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आजपर्यंत निवडणूक लढविली. या निवडणुकीमध्ये विकासाचा संकल्प घेऊन जनतेशी संवाद साधला. प्रचारादरम्यान, जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. आज कडक उन्हात जिवाची लाहीलाही होत असताना मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्‍या. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्‍या या उत्‍सवात उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्याबद्दल जनतेला मी धन्‍यवाद देतो,’ अशी प्रतिक्रिया ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

निवडणुकीतील विजय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन भाजपाने कायम जनतेनी सेवा केली आहे व यापुढेही ही जनसेवा आम्‍ही निरंतर करत राहू. भाजपा-महायुतीच्‍या माध्‍यमातून हा सेवायज्ञ आम्ही असाच पुढे नेणार आहे, असेही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेकच्या गढावर ‘धनुष्य-बाणा’च्या विजयाची होणार हॅट्रिक - राजू पारवे

Sat Apr 20 , 2024
 मतदरांचा उत्साह महायुतीचा विजय निश्चित  पं. नेहरू शाळेच्या मतदान केंद्रात राजू पारवेंचे सहपत्निक मतदान रामटेक :- देशाचे सक्षमीकरण करण्यासाठी होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आज पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमित जागरूक मतदारांनी नरेंद्र मोंदीना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार या झालेल्या मतदानातून स्पष्ट होत आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com