नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

रामटेक :- नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी गावाजवळ सर्व्हिस रोडने जाणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक देऊन अपघात झाल्याची घटना दि.13 डिसेंबर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, NL 01 AG 1988 क्रमांकाचा ट्रेलर पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेच्या समोरील सर्व्हिस रोडने जवळपास 80 ते 90 च्या वेगाने जबलपूर कडे जात होता. खुमारी जवळ येताच चालकाला ट्रेलर नियंत्रित न झाल्याने रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आलेल्या दोन्ही रस्ता दुभाजकावरून ट्रेलर विरुद्ध दिशेने टाकले. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक HR 55 AJ 1026 क्रमांकाच्या ट्रकला मागेहून जोरदार धडक दिली व धडक देऊन तो ट्रेलर विरुद्ध दिशेच्या सर्व्हिस रोडला जाऊन थांबला. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झालेला असून त्याचा उजवा पाय तुटला असल्याची माहिती आहे. ट्रेलर चालकाचे नाव नूर अली (वय 32 वर्ष) रा.हसनबाग नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची माहिती तात्काळ ओरिएंटल टोल प्लाझा येथे देण्यात आली.टोल प्लाझाचे कर्मचारी मनोज ठाकरे, दत्तू महाजन, PRO लोखंडे, मनोज तनोडिया यांनी कोणतीही वेळ न गमावता तात्काळ घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने चालकास बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.चालकाची अवस्था बघून त्याला नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लग्नापूर्वी वर -वधूची सिकलसेल तपासणी करणे गरजेचे -डॉ शबनम खाणुनी

Wed Dec 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेलचा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे .भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आव्हान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com