टेकाडी ग्रा प सदस्य सतिश घारड नी रक्तदान करून स्विकारला पदभार

सहकाऱ्यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन .  

कन्हान :- ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत प्रभाग क्र.२ मधुन युवा शक्ती ग्राम विकास पॅनलच्या सतीश घारड यांनी ९७२ मतां पैकी ४१८ मत घेऊन दणदणित विजय मिळवला. अपक्ष पद्धतीने लढलेल्या या उमेदवाराच्या सहकार्यांनी पदभार स्विकारण्या आधी रक्तदान करण्याचा संकल्प करून तोही यशस्विकरून दाखविल्याने गावात सध्या या अनोख्या संकल्प नेची चांगलीच चर्चा आहे.

गुरूवार (दि.५) जानेवारीला महाजननगर मित्र परिवार टेकाडीद्वारा समाज भवन परिसरात रक्तदान शिबिराचे करून शुक्रवारला ग्राम पंचायत सदस्य म्हणुन पदभार स्विकारण्या आधी काही तरी आगळ वेगळा उपक्रम करण्याची संकल्पना व्यकत करित समर्थकांनी रक्तदान करून पदभार स्विकारण्याची संकल्पना गुरुवारला रक्तदान शिबीरात नवनिवार्चित टेकाडी (को ख) ग्रा प सदस्य सतीश घारड यांनी रक्तदान करून शुक्रवारला सदस्य पदाचा कार्यभार सांभाळला. ” गावकरी मतदात्यानी केलेल्या अमुल्य मतदान आणि सहका-यांचा रक्तदानाचा विश्वास निर्थक जावु देणार नाही. सर्वसामान्य माणसांची योग्य ती कामे करून ग्राम पंचायत अंतर्गत कराव्या लागणा ऱ्या विकासात्मक कामांच्या प्रयत्नाला तडा जाऊ देणार नाही” अशे मत शिबिरा दरम्यान सतिश घारड यांनी व्यक्त केले. शिबिराला प्रामुख्याने विशेष फुटाणे , रमेश दळणे, डॉ. अनिल नानवटकर, मारोती हुड, आकाश कडु, गिरधर चिकाने, नितेश वानखेडे, सारंग हुड, राजकुमार वझेकर, दुष्यंत राऊत, सुरेश हुड, विशाल सरनागते, सौरव बोरकर, बंटी दळणे, लोकेश हुड, अभिजित लंगडे, अविनाश उमप, बंटी भुते, अमित भोयर, श्रीकांत हुड, नरेश घारड सह ग्रामस्थाचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपने आजपर्यंत कधीच अधिकृत उमेदवार दिला नाही -आमदार नागो गाणार यांनी स्पष्ट् सांगितले

Sat Jan 7 , 2023
नागपूर :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची मानल्या जाते. भाजपचा गड मानल्या जात असलेल्या नागपुरात पक्षाचा पाठिंबा कोणाला मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच यंदा मात्र संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची तारिख आली असताना भाजपाने अद्याप कोणत्याच उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला नाही. – नागो गाणार म्हणाले नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com