हे पाहूनही डोळ्यात पाणी आले नाही तर… असे का म्हणाले अनुपम खेर?

अभिनेते अनुपम खेर यांच्या बहुचर्चित ‘काश्मिर फाइल्स’ सिनेमाचा ट्रेलर अनेकदा पाहिला गेला आहे. हाच ट्रेलर कूवर पोस्ट करत खेर यांनी काही भावनिक ओळीही पोस्ट केल्या आहेत.

खेर यांनी लिहिले आहे, हे आहे ‘काश्मिर फाइल्स’ सिनेमाचे ह्रद्यविदारक ट्रेलर. हे पाहूनही तुम्ही अंतर्बाह्य हलून जाणार नसाल तर…तीन मिनीट तीस सेकंदांचे हे ट्रेलर काश्मिरी पंडितांच्या संघर्षमय जगण्याची झलक दाखवते. ‘काश्मिर फाइल्स’ हा सिनेमा अभिनेते विवेक अग्निहोत्री यांनी लिहीला व दिग्दर्शित केला आहे. याआधी अग्निहोत्री यांचा ‘द ताश्कंद फाइल्स’ सिनेमाही चर्चेत आला होता.

‘काश्मिर फाइल्स’बाबत खेर सातत्याने सोशल मीडियावर लिहीत आहेत. मागे एकदा ‘कू’वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले होते, ‘हा सिनेमा माझ्या ह्रद्याच्या अतिशय जवळ आहे. ही कलाकृती मी माझ्या वडिलांना अर्पण करतो. माझ्यासाठी हा केवळ सिनेमा नाही तर मी व माझ्या पिढ्यांनी जगलेलं हे वास्तव आहे, जे तब्बल तीसहून अधिक वर्ष लपवून ठेवलं गेलं. आता मात्र हे सत्य समोर आल्यावाचून राहणार नाही.’

या सिनेमात खेर यांनी पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारलं आहे. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. त्यांना आपल्या कुटुंबासह एका भयाण रात्री काश्मिरमधून परागंदा व्हावं लागतं.

खेर सोशल मिडीयावर विविध मार्मिक सुविचारही आवर्जून शेअर करत असतात. आज असाच एक अर्थपूर्ण सुविचार त्यांनी शेअर केला आहे. ‘रिश्ते बनाना उतनाही आसान है जितना मिट्टी पर मिट्टी से लिखना पर रिश्ते निभाना उतनाही मुश्किल है जितना पानी पर पानी लिखना.’ खेर यांनी शेअर केलेल्या या अर्थपूर्ण ओळी त्यांच्या चाहत्यांना अतिशय आवडत आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'सोयाबिन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' या पुस्तकाचे लोकार्पण

Tue Feb 22 , 2022
‘सोयाबिन डिजिटल शेती शाळा पुस्तक शेकऱ्यांसाठी उपयुक्त’- कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई दि, 22 : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com