क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श शिक्षकांनी आत्मसात करावा – ॲड. सुलेखा कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या शिक्षिका तसेच समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाचा आदर्श शिक्षकांनी आत्मसात करावा असे आव्हान ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ड्रॅगन पॅलेस येथील सभागृहात हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्थेच्या तर्फे आयोजित कार्यक्रमात ॲड. सुलेखा कुंभारे यांनी वरील आव्हान केले. त्या पुढे म्हणाल्या की, महात्मा जोतीबा फुले यांनी आपली सहचारीणी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून तयार केले. व मुलींकरिता शिक्षणाची दारे उघडलीत. शाळेत शिकविण्याकरिता जात असतांना त्यांच्या अंगावर शेणमातीचे गोळे फेकले जात होते. अनेक प्रकारचे दोषारोपण लावली जात होती. परंतू सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत तर विषम परिस्थितीचा मुकाबला करून शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. अशा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करायची असेल तर त्यांच्या शिक्षणाचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करावे असे मत ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी माल्यार्पण करुन सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुलच्या प्रिंसीपल अंम्बरीन फातिमा यांनी केले. तसेच हरदास विद्यालयचे प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाला हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुलचे शिक्षक व कर्मचारी वृंद मोठया संख्येनी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'श्री'च्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत

Wed Jan 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठीत अवतरले शेगाव कामठी :- आज 3 जानेवारीला संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज पालखि यात्रेचे टिमकी चौक नागपूर येथून कामठी येथे पोहोचताच ठिकठिकाणी या पालखि यात्रेचे जँगी स्वागत करण्यात आले.ही पालखी यात्रा टिमकी चौक नागपूर येथिल श्री हरिहर गजानन निवसस्थानातून प्रस्थान होऊन रामटेक येथे समापन होणार आहे. ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com