कमला नेहरू महाविद्यालात शिक्षक दिन संपन्न

नागपूर :- स्थानिक कमला नेहरू महाविद्यालयात दि. 5.9.2023 ला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.. डॉ. राधाकृष्णन 1962 मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली मात्र डॉ. राधाकृष्णन यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले शिक्षक म्हणजे फक्त शाळा महाविद्यालयात शिकवितात तेच नाही तर आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर मदत करणारे, मार्ग दाखविणारे तसेच मार्गदर्शन करणारे प्रत्येकजण हे आपले शिक्षकच असतात. जगभरात शिक्षकांचे स्थान अत्यंत आदराचे व सन्मानाचे मानले जाते..

आज कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंशासनद्वारे महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य अत्यंत कुशलतेने व शिस्तीने पार पाडले. भविष्यातील शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी आपली भूमिका चोखपणे साकारून कुशल अध्यापनाद्वारे विद्याथ्र्यांवर अमीट झाप उमटवली. आज जे विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्या विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता. आजचे विद्यार्थी भविष्यात उत्तम व आदर्श शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यास समर्थ असल्याचे दिसून आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा शिक्षक दिनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून हार्दीक शुभेच्छा दिल्यात व स्वयंशासनाच्या कार्यक्रम जवाबदारीने तसेच शिस्तीने पार पाडण्यास फार मोलाचे सहकार्य केले.

सर्वप्रथम डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा तसेच लोकप्रिय आमदार अॅड. अभिजित वंजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे सुध्दा स्वयंशासनाचा कार्यक्रम पार पाडण्यास अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकरी सेनेचे (उबाठा ) प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

Wed Sep 6 , 2023
मुंबई :- शेतकरी सेनेचे (उबाठा) प्रदेश सरचिटणीस तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गिड्डे पाटील यांचे स्वागत करत भाजपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com