पेसा क्षेत्रात कंत्राटी तत्वावर शिक्षक पदभरती

यवतमाळ :- पेसा क्षेत्रात रिक्त असलेली अनुसूचित जाती प्रवर्गातील प्राथमिक शिक्षकांची पदे नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी दि.2 ऑगस्ट पर्यंत आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थेच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकातून तद्नंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासनाचे निर्देश आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची 268 रिक्त पदे भरण्यासाठी दि.30 जुलै ते दि.2 ऑगस्ट पर्यंत आवेदन पत्र मागविण्यात आले आहे. आवेदन पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावले प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे सादर करावे. सदर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील व प्रतिमाह मानधन 20 हजार इतके देण्यात येईल.

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांनी सेवा निवृत्तीबाबत व इतर कागदपत्रासह आवेदन पत्र सादर करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायासाठी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उपोषणावर

Wed Jul 31 , 2024
– न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव ! नागपूर :- कोराडी पावर प्लांट महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने 1972 पासून जमीन संपादित करून वीज प्रकल्प तयार करण्यासाठी शेतीच्या मोबदल्यात घराघरातील प्रत्येकी एकाला सरकारी नोकरी देऊ असे त्यावेळेस कंपनीने आश्वासन दिले होते. त्याच वेळेस जिल्हाधिकारी यांनीही आश्वासन दिले होते. 2009 नंतर आम्हाला कायमस्वरूपी नोकरी न देता फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर घेऊन तुटपुंज्या मानधनावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com