नागपूर :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून बसपाने निमा संजय रंगारी (मोहरकर) यांना उमेदवारी दिली असून सध्या त्या जनसंपर्क दौऱ्यावर निघालेल्या आहेत. आज त्यांनी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आजच्या जनसंपर्कची सुरुवात केली.
यावेळी प्रसिद्ध शिक्षक कार्यकर्ते शामराव तिरपुडे यांचेशीही सविस्तर चर्चा झाली. यावेळी रंगारी यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव विजयकुमार डहाट, संजय रंगारी, सुरजभान चव्हाण, दयाशंकर कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बसपा च्या उमेदवार निमा रंगारी ह्यांना नागपुरातून प्रथम पसंतीचे जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल यावर विशेष चर्चा करण्यात आली.