संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र नागपूर येथे नुकतेच टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 759 ग्रामपंचायत पैकी 80 ग्रामपंचायतीची टी बी मुक्त ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली त्यात कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायतचा समावेश असल्याने या गौरव सोहळा कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ता कोकुर्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या हस्ते कढोली ग्रा प सरपंच लक्ष्मण करारे,सचिव उदय चांदूरकर, गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ मोहनिष तिवारी,डॉ अमृता देशमुख यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मूर्ती तसेच प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद च्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ विद्यानंद गायकवाड,डॉ राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर,आदी उपस्थित होते.