नागपूर :- पत्रकार भवन येथील आज सायंकाळी 6 वाजता. राष्ट्रीय टॅक्सी चालक-मालक संघटने च्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी विनोद व्यवहारे यांनी सांगितले की, ओला उबर टॅक्सी चालक मालक यांच्या विविध समस्या संदर्भात विनोद व्यवहारे यांचे नेतृत्वात येत्या १० ऑक्टोबर ला यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता. चालक-मालकांचा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चामध्ये 300 ते 400 टॅक्सी चालक सहभागी होतील. असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
राष्ट्रीय टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर चवरे, कार्याध्यक्ष विनोद व्यवहारे, सचिव राजू बोकडे, कोषाध्यक्ष राजू बुरकुटे, मनोज केळवदे, प्रवीण नार्देलवार, मोनु पाजी, चेतन सोनवाणे, दीपक भांडारकर, योगेश लिमजे, प्रशांत गथांडे, इम्रान खान, सुरेश कारेमोरे यांची उपस्थिती होती.