शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी कर संकलन केंद्र राहणार सुरु 

नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा मनपा मुख्यालयासह दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. कर संकलनाच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२०२३ या वर्षात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता तसेच मालमत्ता कर धारकांना कराचा भरणा सोईचे व्हावे म्हणून ४ फेब्रुवारी २०२३ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशीही (दिनांक ७ मार्च, २०२३ धुलिवंदन वगळुन ) दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र व सिव्हील कार्यालय मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या व्यवस्थेचा लाभ घेउन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CMPFO के बोर्ड ऑफ ट्रस्टी की बैठक, अतिरिक्त टैक्स के 277 करोड़ की हुई वापसी

Sat Feb 4 , 2023
– मिली जानकारी के अनुसार कमिश्नर विजय कुमार मिश्रा बैठक में जानकारी दी कि सीएमपीएफओ खाते पर अतिरिक्त कर लग रहा था। नागपुर :- दिल्ली में सीएमपीएफ बोर्ड ऑफ ट्रस्टी की 175वी बैठक संपन्न हुई । उपरोक्त बैठक की अध्यक्षता कोयला सचिव अमृतलाल मीना  ने की, बैठक में सभी संगठन के बोर्ड ऑफ ट्रस्टी मेंबर, निदेशक(कार्मिक), सीआईएल विनय रंजन एवम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com