तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान समाजाला प्रेरणादायक – माजी जी. प.अध्यक्ष सुरेश भोयर

कामठी :- सत्य व अहिंसा या दोन गोष्टींचे समर्थन करून तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली त्यांचे तत्वज्ञान आजही जीवनात भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवितो.जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान हे समाजाला प्रेरणदायी आहे असे मौलिक प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी येरखेडा येथील बुद्ध धम्म संदेश समितीच्या वतीने बौद्ध पौर्णिमेच्या पर्वावर आयोजित कॅण्डल मार्चच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. महाधम्माविराणूवस्त्र बुद्ध विहार येथून सजविलेल्या रथावरील तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतिमेचे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते पूजा करून कँडल मार्चला सुरुवात करण्यात आली यावेळी पुज्यनिय भंते देवानंद, पुज्यनिय भंते विनयशील ,नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सरपंच सरिता रंगारी,उपसरपंच मंदा महल्ले ,राखी शिरपूरकर, तृप्ती शिरपूरकर ,सिद्धांत शिरपूरकर, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, कृष्णकुमार भगत, प्रभाकर शिरसाट,अतुल राऊत,संजीव मेश्राम, अनिल पाटील, गौतम तपासे, सुमेध दुपारे, गौतम पाटील, कुलदीप पाटील, विनोद बावनगुडे, कमलेश बागडे ,प्रिया दुपारे आदी उपस्थित होते.  हे कॅन्डल मार्च शिव पंचायत मंदिर, दुर्गा चौक,टीचर कॉलनी, रामकृष्ण लेआउट ,दुर्गा लेआउट ,प्रीती लेआउट,उपाशे लेआउट मार्गे नगर भ्रमण करीत दुर्गा चौक येथील बुद्ध विहार येथे समापन करण्यात आले.दरम्यान कँडल मार्च चे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. कॅण्डल मार्चच्या यशस्वी आयोजना करीता ग्रा प सदस्य अनिल पाटील,गौतम पाटील,सुमेध दुपारे,कुलदीप पाटील, कल्पना तांबे, भरत साहारे ,योगेश भगत ,आशिष बावनगडे, राहुल पाटील ,आशिष मेंढे,नवनीत सहारे ,निकिता पाटील ,शालिनी मनोरे ,राणी पवनीकर ,प्रिया दुपारे ,अनिता मोटघरे ,सुजाता गजभिये ,कल्याणी रामटेके, शोभा ढोके ,संगीता मेश्राम, जयवंती मेश्राम, चंद्रपाल सहारे ,पृथ्वीराज देशमुख ,अतुल धोंगडे, सुदेश नितनवरे, मनोहर मोडगरे ,अनिल बनकर ,नितेश यादव ,शिशुपाल बागडे ,सोनू गजघाटे ,प्रदीप मेश्राम, राजकुमार सोनारे ,संजय पिल्लेवार ,गौतम नितनवरे ,राकेश वानखेडे, बुद्धाजी गडपाहिले ,राजकुमार पिल्लेवान ,सूर्यभान पाटील, प्रमोद मडके, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले संचालन गौतम पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन सुमेध दुपारे यांनी मांनले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढी ग्रा. पं. च्या इतिहासात प्रथमच निवडून आलेल्या मातंग समाजाच्या ग्रा. पं सदस्याचा सत्कार

Sat May 6 , 2023
कोदामेंढी :- येथे मागील चार महिन्यापूर्वी ग्रा.पं च्या सार्वात्रिक निवाडनूकित वार्ड क्र.3 मधून मातंग समाजाच्या कोमल पंकज खड़से प्रथमच निवडून आल्या. खड़से यांनी ग्रा. पं कोदामेंढीत ग्रा.पं.च्या इतिहासात मातंग समाजातून श्रीगणेशा केल्याने अण्णाभाऊ साठे संस्था भंडारा तर्फे अण्णाभाऊ साठे यांची फोटो व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे संस्था भंडारा येथील पदाधिकारी गणेश ढोके, ईश्वर कांबले, किशोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com