मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान : – क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे हयाने प्रथम क्रमाक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा वर्धा जिल्हयातील देवळी येथे मंगळवार (दि.२०) डिसेंबर २०२२ ला संपन्न झाल्या. यात धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान चा विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे याने १४ वर्ष वयोगटातील कुस्ती मध्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित विदर्भातुन अव्वल, प्रथम क्रमाक पट काविला आहे.
सदर यश संपादन करतांना तन्मय ने भंडारा, वर्धा, गडचिरो ली या जिल्हयातुन आलेल्या शालेय विद्यार्थी खेडाळु मल्लांना आपल्या डाव पेचाने व चपळाईने चारी मुंड्या चित केले. या सोबतच त्याची महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. या यशासाठी क्रीडा शिक्षक हरिश केवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. धर्मराज विद्याल यातील माध्यमिक चे मुख्याध्यापक रमेश सखरकर, प्राथमिक चे मुख्या ध्यापक खिमेश बढिये, उपमुख्यध्यपिका, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वृंदा नी तन्मय चरडे व प्रशिक्षक हरीश केवटे सर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.