– बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही…
नागपूर :- नागपूरच्या रहिवाशांना उच्च दर्जाचे आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने पढील जलकुंभांच्या (Elevated Service Reservoirs – ESRs) नियोजित साफसफाईची घोषणा केली आहे:
– भांडेवाडी ईएसआर गुरुवार, 28 नोव्हेंबर 2024
– भारतवाडी (देशपांडे लेआउट) ईएसआर शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
– बाबुलबन नगर ईएसआर शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
साफसफाईच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईलः
1. भारतवाडी ESR CA: देशपांडे लेआउट, आदर्श नगर झोपडपट्टी, हिवरी कोटा, शैलेश नगर, देवी नगर, कामाक्षी नगर, सदाशिव नगर, वाठोडा वस्ती, घर संसार सोसायटी, सालासर विहार कॉलनी, न्यू सूरज नगर, संघर्ष नगर
2. भांडेवाडी ESR CA: पवनशक्ती नगर, अब्बूमिया नगर, तुळशी नगर, अंतुजी नगर, मेहर नगर, साहिल नगर, सरजू टाउन, कहांडवाणी टाउन, वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, महेश नगर, सूरज नगर
3. बाबुलबन ESR CA: हिवरी नगर, पडोळे नगर, पँथर नगर, पडोळे नगर झोपडपट्टी, हिवरी नगर झोपडपट्टी, शास्त्री नगर झोपडपट्टी, बाबुलबन, शिवाजी सोसायटी, ईडब्ल्यूएस कॉलनी, एमआयजी कॉलनी, एलआयजी कॉलनी, शास्त्री नगर, दत्ता नगर, कुम्भारटोळी, वर्धमान नगर, ईस्ट वर्धमान नगर, ट्रान्सपोर्ट नगर
टाकीच्या साफसफाईच्या कालावधीत, या बाधित भागात पाणीपुरवठा होणार नाही, तसेच पाण्याची टैंकर सेवा देखील तात्पुरती अनुपलब्ध असेल. नागरिकांना विनती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
NMC-OCW ने उपरोक्त प्रभावित भागातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि या काळात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.