संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्व. नितिन रायबोले गुरूजी स्मृति प्रित्यर्थ भव्य तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भूषणनगर दादीमा किराणा स्टोर जवळ न्यू येरखेड़ा, कामठी येथे शनिवार दि 16 सप्टेबंर 2023 ला सांयकाळी 5 वाजता करण्यात आले.
उत्कृष्ट वेशभूषा धारकांना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस आणि सर्व सहभागी बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम अध्यक्ष ब्रह्मकुमारी प्रेमलतादीदी,प्रमुख पाहुणे पंकज साबळे सरपंच रनाळा,सरिता रंगारी सरपंच येरखेड़ा, मनिषा जाधव पोलिस उप निरीक्षक पो स्टे नवीन कामठी, सुनील चलपे सदस्य ग्रामपंचायत रनाळा,नारायण नितनवरे बरिएम नेता प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुनील संतोषवार यांनी केले तर संध्या रायबोले यांनी सर्वांचे आभार मानले.