आदर्श नगर येथे तान्ह्या पोळा साजरा.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- आदर्श नगर येथील संत तुकाराम महाराज बाल उद्यान येथे आदर्श नगर कृती समिती तर्फे तान्ह्या पोळा साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सेवानिवृत्त बीएसएफ चे सैनिक शेषराव आढाऊ , डॉ निखिल अग्निहोत्री ,कामठी अर्बन निधी लिमिटेड बँके संचालक नितीन ठाकरे, दिव्यांग संस्था चे अध्यक्ष बॉबी महेंद्र, व्यापारी मित्र मंडळाचे नरेश सोरते आदी विशेष अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बालगोपालांच्या बैलांची विधिवत पूजा करून त्यांना भेटवस्तू व मिष्टांना प्रदान करण्यात आले .

याप्रसंगी आदर्श नगर चे रामचंद्र नागपूरे ,भाऊराव चौधरी ,हरिचंद्रजी फुलारे , श्याम ठाकरे ,गुप्ताजी आदी जेष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजना करीता राजू जंगितवार ,अमोल नागपुरे , प्रदीप( बाल्या )सपाटे , पंकज फुलारे, अतुल ठाकरे , प्रा.पराग सपाटे ,निखिल नागोसे, आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार थंडावले..

Mon Aug 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – इच्छुकांच्या हालचाली संथ निवडणुकीच्या आदेशाची वाट कामठी ता प्र 29 :- कामठी नगर परिषद निवडणूक लागणार अशा स्थितीतच राज्य सरकारचे सत्तेचे न्यायालयीन घोडे उभे झाल्याने अपेक्षित नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुका लांबणीवर गेल्या .वास्तविकता कामठी नगर परिषद निवडणूक कार्यक्रमाची कार्यलयीन पायरी ही आरक्षण सोडत संपेपर्यन्त पोहोचली आता निवडणूक लागणे अपेक्षित होते मात्र निवडणूक आयोगाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com