-बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे कायम निदानाबाबत डॉ. गौरव खेरे व डॉ. दीप्ती जैन यांचे मार्गदर्शन
-विदर्भातील सिकलसेल ग्रस्तांसाठी ‘एसएमटीसीटी‘चा अभिनव उपक्रम
नागपूर वंचित घटकांमध्ये सर्वाधिक आढणारा सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तदोशातून होत असतो. नागपूरसह विदर्भात सर्वाधिक आढळणार्या या आजराबाबत हवी त्याप्रमाणे जनजागृती न झाल्याने आतापर्यंत या आजारावर निर्बंध घालता आले नाही. मात्र, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) द्वारे या आजारातील ग्रस्त रूग्ण कायमचे बरे होऊ शकतात ही आनंदाची बाब आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्ट (एसएमटीसीटी) आणि जीएमसीच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन यांच्या विशेष प्रयत्नाने बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ञ् डॉ. गौरव खेरे यांच्या मार्गदर्शनात बोन मॅरो ट्रान्सप्लांटबाबत जनजागृती अभियान तसेच एकदिवसीय शिबिराचे बुधवारी 6 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. उपरोक्त शिबिर टाटा कॅपिटल हाईट्स, उंटखाना, मेडिकल चौक येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत घेण्यात येणार आहे. याशिवाय निःशुल्क एचएलए टायपिंग टेस्टिंग सुविधा सुद्धा रूग्णांना या शिबिरात मिळणार. पहिल्यांदाच नागपुरात अश्या प्रकारचे शिबीर होत असून यात रुग्णांची तपासणीसह रुग्णांचे सुनियोचित मार्गदर्शन करण्यात येणार.
दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हाॅस्पीटलमधील बोन मॅरो ट्रान्सप्लांट संचालक डॉ. गौरव खेरे यांच्या मार्गदर्शनात उपरोक्त शिबीर संपन्न होणार. बीएमटीचे फिजीशीयन म्हणून ख्यातिप्राप्त डाॅ. गौरव खेरे यांनी गेल्या 7 वर्षांपासून जगात विविध ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे रूग्णांना बरे केले आहे. नागपुरातील शिबिरात डॉ. गौरव खेरे व डॉ. दीप्ती जैन हे रुग्णांची चाचणी तसेच समुपदेशन करतील. विदर्भातील प्रत्येक रूग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटबाबत मिळावी या हेतूने जीएमसीच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लीना तामगाडगे यांच्या मार्गदर्शनात स्तुत्य अभियानाची सुरूवात शिबिरामार्फत करण्यात येत आहे. याप्रसंगी डाॅ. दिप्ती जैन, स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टच्या सचिव निरगुसना ठमके यांच्या उपस्थितीत रुग्णांना हवे ते सहकार्य करण्यात येणार आहे.
रुग्ण तपासणी नोंदणी सुरु
या शिबिरात सुरक्षितपणे आणि कमी खर्चात सिकलसेल ग्रस्तांना नावीन्यपूर्ण आजाराचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ चिकित्सक मार्गदर्शन करून रूग्णांसोबत संवाद साधणार. नागपूरसह विदर्भातील रूग्णांच्या तपासणी नोंदणीला सुरुवात झाली आहे- गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेण्याकरिता अरीहंत रूग्णालयाच्या सोशलवर्क कोऑर्डिनेटर अर्चना (8788810267) तसेच स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरीटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे (8208353222) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.