बेला : जवळच्या आष्टा पाटीवरील तामसवाडी येथील शिवमदिरात गीता जयंती निमित्त पार पडलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास भाविक भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ह .भ .प. लक्ष्मणराव देशमुख महाराज यांचे सुश्राव्य प्रवचनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमनबाई तेलरांधे यांच्या पुढाकारातून संपन्न होणाऱ्या धार्मिक उत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे.
देशमुख महाराजांच्या हस्ते बुधवार ८ डिसेंबरला सप्ताहाचा शुभारंभ ज्ञान कलश स्थापने झाला. सदर धार्मिक सप्ताहामध्ये सकाळी व सायंकाळी भागवत कथेची पारायण करण्यात आले. तसेच दररोज सायंकाळी सहा वाजता मंदिरामध्ये हरिपाठ वाचन झाले. वेगवेगळ्या रात्री स्थानिक शिवशक्ती भजन मंडळ तामसवाडी, वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ आष्टा व बाल गणेश भजन मंडळ आष्टा च्या गायक कलावंतांनी शिवमंदिरात सुगम संगीत भजनाचा कार्यक्रम भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. 15 डिसेंबरला शिव मंदिरातून मनोहारी आकर्षक पालखी दिंडी यात्रा काढण्यात आली. यावेळी दिंडी भजनी कलावंत तल्लीन होऊन गेले होते. सायंकाळी स्नेहभोजन व महाप्रसाद कार्यक्रमाचा तामसवाडी सह आष्टा, खर्डा येथील असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला.. यावेळी बेला येथील गुरुवर्य लक्ष्मणराव खोडके प्रामुख्याने उपस्थित होते.
भागवत सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी दत्तू चौधरी, बाबुराव डाखोळे, रुपेश देशमुख, अशोक शंभरकर, अरुण माहुरकर, अक्षय वरखडे, खुशाल चाफले, दिलीप सुरकार ,महादेव शिंदे, उमेश ढोबळे, वासुदेव उईके नांद्रा ,अभिजीत ठवरे ,राहुल सुरकार व इतर अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.