मालमत्ता करात सुटचा लाभ घ्या 31 डिसेंबरपर्यंत

– ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास 5 टक्के सवलत

– व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे करता येणार भरणा

चंद्रपूर :- नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी 4 टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना 5 टक्के सुट देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 80 हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.

करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पवार,अजित अनंतराव

Fri Dec 6 , 2024
पवार,अजित अनंतराव जन्म : २२ जुलै १९५९ जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका – राहुरी, जिल्हा – अहमदनगर. शिक्षण : बी.कॉम. ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा. अपत्ये :एकूण २ (दोन मुलगे). व्यवसाय : शेती. पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मतदारसंघ : २०१ – बारामती, जिल्हा-पुणे, इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!