स्वामी विवेकानंद स्मारकाची महापौरांनी केली पाहणी

-स्वच्छता, डागडुजी, देखरेखीकडे लक्ष देण्याचे दिले निर्देश

नागपूर : अंबाझरी तलावालगत साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी मंगळवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्मारक परिसराची पाहणी करून परिसरातील स्वच्छता, स्मारकस्थळाची डागडुजी आणि संपूर्ण देखरेखीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.

            याप्रसंगी कार्यकारी अभियंता अजय मानकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, स्मारक स्थळाच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळणारे ओम इंटरप्राइजेसचे नानाभाउ घोडमारे आदी उपस्थित होते.

            स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी स्वामी विवेकानंदांचे काही म्यूरल उभारण्यात आलेले आहेत. या म्यूरलची स्वच्छता व त्यांची रंगरंगोटी करणे. स्मारकाच्या आतील परिसरातील काही ठिकाणी टाईल्स तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी टाईल्स निघालेल्या आहेत. या सर्व भागाची दुरूस्ती करणे. स्मारक परिसरात लावण्यात आलेल्या मार्बलवर काईली चढल्याने स्मारकाच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून त्वरीत काईली काढण्यात यावे, असे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

            स्मारकाच्या बाजून ओव्हरफ्लो असल्याने स्मारकाच्या सौंदर्यात भर पडते. सध्या ओव्हरफ्लो बंद असल्यामुळे पाणी वाहणा-या भागामध्ये गवत, कचरा वाढलेला आहे. याबद्दल स्वच्छता विभागाद्वारे तातडीने कर्मचारी नियुक्त करून संपूर्ण कचरा साफ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उद्यान परिसरात ‘माय लव्ह माय नागपूर’ हे कटआउट नागपूर शहराची ओळख दर्शवित आहेत. या मागील भागात काही महिन्यांपूर्वी झाडाच्या फांद्या खचून पडल्या. तुटलेल्या झाडाच्या फांद्या, इतर कचरा तातडीने साफ करणे. तसेच परिसरातील इतरही झाडांची छाटणी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

            स्मामी विवेकानंद स्मारकापुढील मार्गावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्त्याच्या बाजूचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात मलबा पडून आहे. हा मलबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने साफ करून घेण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवनचरीत्र दर्शविणारे म्यूरल लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक म्यूरलखाली एक टिव्ही स्क्रीन आणि हेडफोन आहेत. या टिव्ही स्क्रीनवर स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील कथा दृकश्राव्य माध्यमात दाखविण्यात येणार आहेत. या भागामध्ये पाणी झिरपत असल्यामुळे भिंतींची अवस्था खराब झालेली असून ती तातडीने दुरूस्त करणे, वरील भागातून पाणी झिरपत असल्याने तिथेही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

            स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकस्थळी नागपूर शहरातील नागरिकांसह बाहेरील लोकही भेट देतात. शहरातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळामध्ये या ठिकाणाची नोंद होते. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य नेहमी राखले जाणे आवश्यक आहे. यासाठी परिसरात नेहमी स्वच्छता राहिल, योग्य देखरेख राहिल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच परिसरातील कामामध्ये झालेल्या दुर्लक्षाबद्दल जबाबदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मंगळवारी ५०० प्लास्टिक पतंगे जप्त

Wed Dec 29 , 2021
-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २८ डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत  ५०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन ५०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५७ दुकानांची तपासणी केली.             याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com