नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.२१) रोजी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरूनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासह टाकल्यासंदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जयप्रकाश नगर वर्धा रोड येथील प्रभू अपार्टमेंट यांच्याविरुध्द रस्त्यालगत गिट्टी पसरविल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत खरे टाऊन पूनम अपार्टमेंट येथील कुलकर्णी बिल्डर्स यांच्याविरुध्द इमारत तोडतांना वायुप्रदूषण केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत घाट रोड येथील डिप्लोमॅट रेस्टॉरेट अँड बार, कॉटन मार्केट येथील हाय टी कॉपरन, अशोक ट्रेडर्स, दर्पण डिस्पोजलस यांच्याविरुध्द प्लास्टिक वापरण्याबाबत कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरूनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासह टाकल्यासंदर्भात सक्करदरा येथील विश्वसुख आयुर्वेद क्लिनिक यांच्या विरुध्द कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी घास बाजार येथील नानोटी क्लासेस यांच्या विरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात लावल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रेमनगर झेंडा चौक येथील यांच्याविरुध्द प्लास्टिक वापरण्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.